कोट्यधीश तेलसम्राट मार्क रिच प्रथमच इतक्या सविस्तरपणे त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल (पत्नी डेनिस हिच्यापासून घेतलेल्या अतिमहागड्या घटस्फोटाबद्दल); तेल व्यवसायामध्ये `तत्काळ’ किंमत चुकवण्याच्या सुरू केलेल्या पद्धतीबद्दल, ज्यामुळे त्यांची भरभराट झाली आणि जगाची आर्थिक गणिते बदलली त्याबद्दल, अयातुल्ला खोमेनींचा इराण, फिडेल गुस्ट्रोचा क्युबा, यादवी युद्धाने गांजलेला अंगोला आणि वर्णविद्वेषी दक्षिण आफ्रिका यांच्याबरोबर केलेल्या फायदेशीर व्यापाराबद्दल, जे आत्तापर्यंत कोठेही प्रसिद्ध झालेले नव्हते त्याबद्दल, त्यांनी गुपचूपपणे इस्रायल आणि अमेरिकेला केलेल्या मदतीबद्दल, (ज्यावेळी रुडी गुलियानी यांनी त्यांच्यावर करविषयक घोटाळ्याचे आरोप ठेवले होते.) आणि अमेरिकेच्या पोलीस खात्याने त्यांच्या अपहरणाच्या केलेल्या बेकायदेशीर आणि तितक्याच विनोदी प्रयत्नांबद्दल, इतक्या मोकळेपणाने आणि सविस्तरपणे बोलत आहेत. कोणाचाही आणि कसलाही मुलाहिजा न बाळगणारे रिच यांचे पहिलेच चरित्र, ज्यांना अध्यक्ष क्लिंटन यांनी विशेषाधिकारामध्ये ती प्रसिद्ध माफी दिली, आणि अॅटर्नी जनरल एरिक होल्डर यांच्या सुनावणीच्या वेळी जी परत बातम्यांचा विषय झाली. हे पुस्तक एक अत्यंत वादग्रस्त आंतरराष्ट्रीय तेल व्यावसायिकाच्या वादग्रस्त कृत्यावर प्रकाश टाकते.असा रिच यांचा थक्क करणारा जीवनपट