Your cart is empty now.
भारतीयांचे सुवर्णस्वप्न
सिंधू थांबलेली नाहीच. तिला थांबणे मान्यच नाही. अखंडित प्रयत्नांवर तिचा विश्वास आहे. गेल्या वेळी जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत तिला अंतिम लढतीत अपयश आले; झुंझारपणे लढत देऊनही आले. पण, ती खचून मात्र गेली नाही. या लढतीनंतर दहाच दिवसांत तिने सरावास सुरुवात केली. रिओ ऑलिंपिक स्पर्धेनंतरही ती अशीच सावरली होती. जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत दुसर्यांदा सुवर्णपदकाने हुलकावणी देऊनही ती खचलेली नाही. जागतिक दर्जाच्या तीन बॅडमिंटन स्पर्धांमधील रौप्यपदके तिच्या नावावर आहेत. एवढे यश देशातील कोणत्याही महिला बॅडमिंटनपटूने मिळविलेले नाही. या यशाने तिचे समाधान झालेले नाही.
तिला आता सुवर्णपदकाच्या दिशेने झेप घ्यायची आहे. टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत तिचे आणि देशाचेही सुवर्णपदकाचे स्वप्न साकार होऊ शकते. सिंधूला लागोपाठ अंतिम लढतींमध्ये पराभूत झाल्याबद्दल मनापासून वाटणारे दु:ख हे तिचे उद्याचे आध्यात्मिक, मानसिक बळ ठरेल. कोट्यवधी भारतीयांच्याही तिला तिच्या कणखर प्रयत्नांसाठी शुभेच्छा आहेत. या शुभेच्छांनिशी ती टोकियोत सुवर्णपदकाकडे झेपावेल...
Added to cart successfully!