Your cart is empty now.
युगमुद्रा
बाबा आमटे ः साधना, वारसा आणि प्रेरणा
बाबा आमटेंच्या जन्मशताब्दीच्या निमित्तानं सिद्ध झालेल्या या पुस्तकात त्या चिरंतनत्वाचं गमक गवसण्याचा प्रयत्न केला आहे. स्वतः बाबा आणि साधनाताईंसह आमटे घराण्यातल्या तीनही पिढ्यांच्या लिखाणाचा या पुस्तकात समावेश आहे. बाबांच्या वारशाचं असं एकत्रित दर्शन पहिल्यांदाच सादर होत असावं.`आनंदवन', 'सोमनाथ प्रकल्प' आणि हेमलकशातील 'लोकबिरादरी'नं प्रेरित झालेले काही शिलेदारही या पुस्तकात लिहिते झाले आहेत. बाबांच्या संपर्कात आलेल्यांपैकी अनेकांचा त्यांच्याशी नियमित पत्रव्यवहार होत असे. त्यातली काही बोलकी पत्रही या पुस्तकात वाचायला मिळतील.
Added to cart successfully!