Your cart is empty now.
आपलं वजन आपल्या हाती
डॉ. मालती कारवारकर
एखादी वजनदार वस्तू हलवायची असेल, तर त्यासाठी एकापेक्षा अधिक माणसांची मदत घ्यावी लागते. हे सामान्य ज्ञान शरीराच्या वजनाच्या बाबतीतही लागू पडतं. पण असा विचार न करता या प्रश्नाकडे पाहताना केवळ दोनच बाबींचा विचार केला जातो. एक म्हणजे कॅलरीज मोजून खाणं आणि मर्यादेपलीकडे व्यायाम करणं. यामुळे ठेवल्या ठिकाणाहून तसूभरही न हलता एकाच जागी अडकून पडलेल्या वजनदार वस्तूप्रमाणे शरीराच्या वजनाचा प्रश्न वर्षानुवर्षं तसाच रेंगाळत राहिला आहे. आता तर हा प्रश्न वैद्यकतज्ज्ञांच्या उपायांनाही दाद देईनासा झाला आहे.
हे असं होण्याचं कारण म्हणजे ‘माणूस’ हा प्रकृतिधर्म घेऊनच जन्माला येतो, याचा माणसाला स्वतःलाच विसर पडला आहे. वजनाच्या प्रश्नाच्या मुळाशी जायचं ठरवलं, तर आजवर दुर्लक्षित राहिलेल्या अनेक कंगोर्यांचं महत्त्व लक्षात येईल. हे लक्षात आलं, तरच या वजन हलवण्याच्या मार्गातले खाचखळगे दृष्टिपथात येतील. असा दृष्टिकोन वापरला, तरच माणसाच्या प्रयत्नांना यश येईल आणि हेही उमजेल, की आपलं वजन राखणं आपल्याच हातात आहे.
अशा या आजवर न दिसलेल्या खाचखळग्यांचा सांगोपांग विचार प्रस्तुत पुस्तकात केला आहे. त्यामुळे नेहमीचा सरधोपट मार्ग सोडून योग्य तो दृष्टिकोन वापरल्यास माणसाला प्रथम आरोग्य आणि नंतर योग्य वजन मिळवण्यात आणि ते राखण्यात यश येईल.
वजनाच्या बाबतीत आहारशास्त्राचा मंत्र हेच सांगतो, की ‘आरोग्य आणि योग्य वजन हातात हात घालूनच येतात.’
Added to cart successfully!