Your cart is empty now.
१५०१ अनमोल सुविचारांचा संग्रह’ या पुस्तकातील सुविचार सागराप्रमाणे अथांग आहेत. सुविचार सागरातील काही थेंब टिपून ते मोती झाले आणि त्याच मोत्यांचे हे सुंदर पुस्तक साकार झाले.१५०१ अनमोल सुविचारांच्या संग्रहातील हे सुविचार व देशोदेशीच्या म्हणी सर्वांसाठीच प्रेरणादायी ठरतील. उद्विग्न मनावरची मरगळ झटकून टाकून पुन्हा मनाला प्रसन्न करतील. प्रतिकूल परिस्थितीतही जगण्याचे बळ देतील. प्रतिकूलतेवर मात करून तिचे अनुकूलतेत रूपांतर करण्याचे सामर्थ्य देतील.ही वैविध्यपूर्ण अशी विचाररत्ने जीवनाच्या अनेकविध टप्प्यांवर चैतन्य, उत्साह, प्रेरणा देऊन योग्यायोग्यतेची जाण होण्यासाठी उपयुक्त आहेत.
Added to cart successfully!