Your cart is empty now.
जग हे एक वैश्विक खेडे बनले आहे.आपण कितीही नाकारले तरी इंग्रजी भाषेचा वापर ही आपल्या जीवनातील अनिवार्य बाब झाली आहे.माहिती व तंत्रज्ञानाच्या विस्ताराने आपल्यापुढे अनेक नवीन क्षितिजे खुली केली आहेत.इंग्लिश ही आंतरराष्ट्रीय भाषा असल्याने तिचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.जगातला असा कोणताही देश नाही जिथे इंग्रजी शिकवली जात नाही.आपल्या एकूण शालेय व महाविद्यालयीन जीवनात आपण १५ ते १७ वर्षं इंग्रजी शिकतो.इंग्रजी व्याकरणाचीही आपल्याला बऱ्यापैकी माहिती असते; मात्र असे असूनही आपल्याला इंग्रजी बोलताना अनंत अडचणी येतात.याचा विचार करताना असे लक्षात आले की, आपल्या शिक्षणपद्धतीत इंग्रजीकडे ‘भाषा’ म्हणून बघितले न जाता केवळ एक मार्क्स मिळवण्यापुरता विषय म्हणून बघितले जाते.
व्याकरणाची भीती व शब्दशः भाषांतर करण्याची पद्धत इंग्रजी संभाषणाच्या वाटेतील मोठे अडथळे ठरतात.तेव्हा सर्वसामान्य लोकांना अचूक व प्रभावी इंग्रजी कसे बोलता येईल याचा आम्ही अभ्यास केला व हे पुस्तक तयार झाले.व्याकरण, वाक्यरचना, रोजच्या वापरातील शब्द, संभाषणकौशल्याविषयी मार्गदर्शन अशा अनेक बाबींचे विवेचन या पुस्तकात केल्याने याला एका संपूर्ण कोर्सचे स्वरूप आले आहे. व्याकरणाबद्दलची भीती व अनास्था घालवण्यासाठी नियमांचा काथ्याकूट न करता त्यांचा वापर करून शिकण्यावर जास्त भर दिला आहे.त्यामुळे हे पुस्तक नव्यानेच इंग्रजी शिकणाऱ्यांपासून ते इंग्रजी आवडणाऱ्यांपर्यंत सगळ्यांच्याच उपयोगी; पडेल, असा विश्वास वाटतो.आपण या पुस्तकाचा काळजीपूर्वक अभ्यास केलात तर इंग्रजी संभाषण करण्याबाबतचा आपला आत्मविश्वास नक्कीच उंचावेल. एकदा आत्मविश्वास निर्माण झाला की, प्रयत्नपूर्वक सरावाने आपण , इंग्रजी संभाषणकौशल्य सहज आत्मसात करू शकाल.
Added to cart successfully!