‘अवती भवती’ हा ख्यातनाम संवेदनशील लेखिका आणि समीक्षक डॉ. विजया राजाध्यक्ष यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेला ललित लेखसंग्रह आहे. विजयाबार्इंची कथा/लेख विशिष्ट मूल्यभाव व्यक्त करतो आणि तरल, काव्यात्म शैलीमुळे अशी कथा विंÂवा लेख वैशिष्ट्यपूर्ण ठरतो. आपल्या आसपास घडणाNया, अगदी साध्या वाटणाNया घटना-प्रसंगांवर तसेच एखादी व्यक्ती, कविता विंÂवा एखादे पुस्तक, आवडता लेखक-कवी अथवा त्यांना भेटलेली, भावलेली वेगळी माणसे (मग ती सामान्य का असेनात!) विंÂवा कोणताही शब्द (उदा.- आरंभ, चंद्रोदय, उरलेपण, संवाद, दिंडी, चिक्कणमाती, नातीगोती) असो; विजयाबाई त्यावर सहज, ओघवत्या शैलीत वाचनीय ललित लेख लिहितात. त्यामध्ये विजयाबाई त्या संदर्भातील एखादी आठवण, जीवनातील एखादा अनुभव, त्या वेळी त्यांचे आणि आजूबाजूला असणाNया लोकांचे वागणे अथवा त्या संदर्भात मनात आलेल्या विचारांचे अगदी नेमके, आटोपशीर वर्णन करतात. हे सर्व त्या कोणताही अभिनिवेश न बाळगता सहजपणे एखाद्या व्यक्तीला गोष्ट सांगावी इतक्या हळुवारपणे, प्रत्ययकारी पद्धतीने लिहितात. सदर पुस्तकातील ललित लेख वाचताना हाच अनुभव येतो. उदा.- ‘बायकांचा डबा’ हा लेख महिलांसाठी आरक्षित असलेल्या रेल्वेच्या डब्याविषयी आहे. त्या अनुषंगाने रेल्वे फलाटावरील गर्दी विशेषत: बायकांची; प्रत्यक्ष रेल्वेगाडी फलाटावर थांबताच जागा पकडण्यासाठी घाईघाईने डब्यात शिरणाNया आणि इाQच्छत स्थळ आल्यामुळे डब्यातून बाहेर येऊ पाहाणाNया बायकांची गर्दी, ढकलाढकली, रेटारेटीचे वर्णन येते. एका विशिष्ट वेळी येणाNया रेल्वेने (लोकलने) नेहमी प्रवास (ये-जा) करणाNया महिला, त्यांचे आपापले ग्रुप, एकमेकींसाठी त्या जागा धरतात. (राखून ठेवतात.) गप्पा मारणे हा तर बायकांच्या खूप आवडीचा विषय. वेळ असेल त्यानुसार एकमेकींचा वाढदिवस साजरा करणे, हळदी- कुंकू संक्रांतीला तीळगुळ वाटप असे छान कार्यक्रम तर होतातच; पण क्वचित भांडाभांडीही! प्रवासात थोडा जास्त वेळ हाताशी असणाNया बायका पुस्तक वाचनाप्रमाणेच जमेल तेवढे शिवण-टिपण, भरतकाम-वीणकाम तसेच अगदी भाजीही निवडतात तर काहीजणी चक्क मस्तपैकी डुलकी घेतात. बसायला जागा मिळवण्यासाठी क्वचित भांडणाNया बायका वेळप्रसंगी - अडचणीच्या वेळी एकमेकींना सद्भावनेने मदतही करतात. अशा तNहेचे सर्व वाचनीय ललित लेख (अर्थात, त्या त्या विषयानुसार) या पुस्तकामध्ये आहेत. आपणही आजूबाजूला असे घटना-प्रसंग थोड्याफार फरकाने दररोज पाहात व अनुभवत असतो; पण विजयाबाई हळुवारपणे, प्रत्ययकारी पद्धतीने त्यावर लिहून हुबेहुब तो प्रसंग साकारतात.