बीग बी अमिताभ बच्चन म्हणजे भारतीय सिनेरसिकांचं जणू दैवत. बीग बींच्या संवादांनी प्रेक्षकांच्या मनावर वर्षानुवर्षे गारूड केलं. याचं श्रेय बीग बींच्या संवादफेकीला जितकं जातं, तितकंच त्या संवादांच्या आशयालाही जातं. हे संवाद म्हणजे जीवनातल्या प्रतिकूलतेवर वर्चस्व मिळवण्याचे धडे देणारा प्रेरणा स्रोतच. हे बच्चनचे ‘बोल’ एका वेगळ्या रूपात आणि समीक्षेत या पुस्तकातून समोर येतात. आणि वाचक नव्याने या संवादाची मौज लुटतो.
.