Shopping Cart

Your cart is empty now.

Shopping Cart

Your cart is empty now.

NETRUTVANIRMITEE by KIRAN BEDI
Rs. 225.00Rs. 250.00
किरण बेदी यांच्या `टॉप कॉप` कार्यकाळात राबवल्या गेलेल्या विविध उपक्रम आणि प्रकल्प यांचे चित्ररूपी दर्शन आपल्याला या पुस्तकात घडते. सामान्यातील सामान्य लोकांना पोलिसांची मदत व्हावी पण लोकांच्या मनात पोलीसांबद्दल असलेली भीती कमी व्हावी हा हेतूसुद्धा या उपक्रमामध्ये होता. किरण बेदी याला `नवोपक्रम` असे नाव देतात. या माध्यमातून लोकांच्या प्रत्यक्ष सहभागातून पोलिसाना सहकार्य व त्यातूनच लोकांच्या समस्यांचे निराकरण असे स्वरूप असलेले विविध उपक्रम याचा आपल्याला सचित्ररूपात आढावा घेतलेला पाहायला मिळतो. प्रत्येक समस्येला तोडगा असतो आणि तो तोडगा लोकसहभागातून काढून त्याचा वापर करून सामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्यात करण्यात आला. या उपक्रमांना सुरुवातीला विरोधही झालेला पाहायला मिळाला मात्र नंतर याचे फायदे आणि उपयुक्तता लक्षात आल्यानंतर लोकांचा उस्फुर्त प्रतिसाददेखील मिळाला. यातील बऱ्याच नवोपक्रमांना राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. पोलीसयंत्रणेत काम करत असताना काही आवश्यक बाबी व साधने उपलब्ध नसतील तर ती लोकसहभागाच्या माध्यमातून मिळवून त्याचा योग्य असा वापर लोकांच्या हितासाठीच केलेला आपल्याला पाहायला मिळतो. किरण बेदी यांच्या पोलिससेवेच्या कारकिर्दीतील `सर्जक` कालखंडाचे उत्तम असे चित्ररूप दर्शन या पुस्तकाच्या माध्यमातून वाचकांना घडते.
Translation missing: en.general.search.loading