स्वराज्याला सुराज्य करण्याच्या एकाच जिद्दीने शिवाजीमहाराज धडपडत राहिले. अहोरात्र रयतेची काळजी करणारे छत्रपती शिवाजीराजे घरातील असंतोष, दुजाभाव थोपवायला पुरेसा वेळ देऊ शकले नाहीत. शिवाजीमहाराजांनी एकाहून एक जिवाला जीव देणारी माणसं जोडली; परंतु आईविना पोरक्या, हट्टी, मनस्वी स्वभावाच्या शंभूराजांचं, आपल्या लाडक्या पुत्राचं मन सांभाळणं महाराजांच्या आवाक्याबाहेरचं ठरलं. दिल्लीत औरंगजेबाचा सपशेल पराभव करून ‘हिंदू स्वराज्याचा झेंडा’ फडकवायचं स्वप्नं हयातभर शिवाजीमहाराजांनी मनी बाळगलं. परंतु परमेश्वरी संकेत काही वेगळाच होता