Shopping Cart

Your cart is empty now.

Shopping Cart

Your cart is empty now.

THE WOMAN IN THE WINDOW by A. J. FINN
Rs. 567.00Rs. 630.00
२४ ऑक्टोबर रविवारपासून सुरू होणाऱ्या या कहाणीची नायिका आहे, मॅनहॅटनमध्ये एका भव्य घरात एकटीच राहणारी, बाल मानसशास्त्रज्ञ असलेली, ३८ वर्षांची अ‍ॅना फॉक्स! सुरुवातच अ‍ॅनाच्या हेरगिरीपासून होते. ती स्वतःच्या घरातून आजूबाजूच्या घरांवर आणि त्यातल्या लोकांवर आपल्या कॅमेऱ्याद्वारे नजर ठेवून असते. गेले दहा महिने तिने स्वतःच्या घराचा उंबरादेखील ओलांडलेला नसतो. अ‍ॅगोराफोबिया असल्याने घरातून बाहेर पडण्याची तिला नेहमी भीती वाटत असते. तशीच ती सातत्याने अगदी सराईतपणे मद्यपान करते. तिला जुन्या जमान्यातले उत्तमोत्तम कृष्ण-धवल चित्रपट पाहण्याचा छंद आहे. तिने आपल्या तळघरामध्ये डेव्हिड नावाच्या एका पेइंग गेस्टला राहायला जागा दिलेली आहे. तिच्या बोलण्यामधून समजते की, तिचा नवरा एड आणि ८ वर्षांची तिची मुलगी ऑलिव्हिया हे दोघेही तिच्यापासून दूर कुठेतरी राहत आहेत आणि ती त्यांच्याशी संपर्क ठेवून आहे. अ‍ॅनाचे डॉक्टर आणि बिना ही तिचा व्यायाम घेणारी स्त्री हे दोघे अ‍ॅनाच्या घरात अधूनमधून ठरावीक काळाने येत असतात. त्यांना अ‍ॅनाबद्दल काळजी वाटते.
Translation missing: en.general.search.loading