Shopping Cart

Your cart is empty now.

Shopping Cart

Your cart is empty now.

Rs. 315.00Rs. 350.00
ध्येयवाद व प्रयत्नवाद यांच्या युद्धात रक्तबंबाळ झालेल्या डॉ नारायण भोसले नावाच्या शरीराला मिळालेल्या विजयाची एक प्रेरणादायी नोंद 'देशोधडी' या आत्मकथेच्या रूपाने मराठी साहित्यक्षेत्रात झाली आहे. एका भिक्षेकरी, भटक्या जमातीतल्या कुटुंबात अनिश्चिततेने भरलेल्या अस्थिर व बुभुक्षित जमातींच्या परावलंबी जीवनपद्धतीचा आणि गेल्या २५ वर्षांपासूनच्या डॉ. नारायण भोसले यांच्या संघर्षमय जीवनपटाचा मला जवळून परिचय आहे. त्यांनी मांडलेले त्यांचे व त्यांच्या समाजाविषयीचे ऐतिहासिक चिंतन प्रामाणिक तर वाटतेच, पण इतिहास व वर्तमान समजून उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करण्यासाठी होतकरूंना ते मार्गदर्शकही ठरेल.... बाळकृष्ण रेणके भटक्या-विमुक्तासाठींच्या राष्ट्रीय आयोगाचे अध्यक्ष भटक्या विमुक्तांतील सामाजिक भान असलेले प्रा. डॉ. नारायण भोसले यांचे देशोधडी' हे आत्मचरित्र नव्याने येत आहे. खरे तर मी त्यांना खूप जवळून ओळखतो. मी असे भाकीत करतो, की त्यांचे 'देशोधडी' हे आत्मचरित्र विमुक्त भटक्यांमध्ये नवीन खळबळ उडवून देणारे ठरेल. विचारशील, चिंतनशील अशा स्वरूपाच्या मराठीतील या आत्मचरित्राचे मोठ्या प्रमाणात लोक स्वागत करतील अशी मला आशा आहे. नारायण भोसले यांनी 'देशोधडी' या आत्मचरित्रात अत्यंत दुःख आणि वेदनांनी भरलेल्या आपल्या आईवडिलांचे जीवन आणि कुटुंबीयांचे शोषण, त्यांची परिस्थिती या सर्व गोष्टी आणलेल्या आहेत. मराठीत साहित्यिक म्हणून त्यांचे मोठ्या प्रमाणात स्वागत होईल.... लक्ष्मण गायकवाड, मुंबई
Translation missing: en.general.search.loading