Shopping Cart

Your cart is empty now.

Shopping Cart

Your cart is empty now.

Rukki by Mahadev More
Rs. 162.00Rs. 180.00

‘रुक्की’ हा ग्रामीण कथासंग्रह. रुक्कीची गरिबी, बेरकी वातावरण व गावात छेडणारे टोळभैरव, या मुशीत रुक्की चांगलीच बदमाश बनते. सासरी ती नांदत नाही व वेश्या बनते. आक्रोश-विलाप-जीवघेणी तगमग हे सौंदर्यवती ‘आम्रपाली’च्या कथेतून जाणवते. ‘नगरवधू’ बनण्याच्या नीच प्रथेला आम्रपाली विरोध करते...तिचे तेजस्वी उत्तर स्त्री जातीचा स्वाभिमान,सन्मान उंचावते.‘नशीब’ कथेचं मूळही स्त्री-अहंकारातच दडलेलं. विकृतपणाने, सूडभावनेने पेटलेले लोक करमदीनचं व त्याच्या भाच्याचं जगणं मुश्किल करतात. त्याचा लाडका घोडा कापून काढतात;मात्र वैमनस्य संपतच नाही. ‘इगत’कथेतले महाबेरकी,संग्या-बाळ्या कुस्त्यांचा फड भरवायचा म्हणून सगळ्यांकडून पैसे लुंगाडतात व लुटलं...असं भासवून गावाला मूर्ख बनवतात. ‘झेंगाट’ कथेतून फ्याट गाडीसाठी ड्रायव्हर व देखण्या गब्रू जावयाचा शोध घेतला जातो. महादेव मोरे यांच्या प्रत्येक कथेतून ग्रामीण जीवनाचं नंबरी इगत(युक्ती) सुटतं. डोळ्यांत अंजन घालणार्‍या या कथा.

Translation missing: en.general.search.loading