साधूने अगदी शांतपणे ते पाणी खळग्यात ओतले. पाणी ओतून होते न होते तोच खळग्यातून एक हिरवा कोंब बाहेर आला. मग त्याची पाने वाढली. पाहता पाहता त्याचे मोठे झाड झाले आणि त्यावर पिकलेले रसरशीत पेरूदेखील दिसू लागले. फळे इतकी वाढली, की त्यांच्या ओझ्याने फांद्या अवजड होऊन करकरू लागल्या.