Your cart is empty now.
Kahani Magachee Kahani कहाणी मागची कहाणी BY G N Dandekar
श्री. गोपाल नीलकण्ठ दाण्डेकरांनीं गेलीं बेचाळीस वर्षं उदंड लिहिलं. त्यांच्यासारख्या नामवंत लेखकाबद्दल, त्यांच्या निर्मितिप्रक्रियेबद्दल, त्यांच्या आगळ्या जीवनानुभवाबद्दल, त्यांनीं लेखनासाठीं घेतलेल्या परिश्रमांबद्दल, त्यांनी निर्मिलेल्या व्यक्तिरेखांबद्दल वाचक, समीक्षक, जिज्ञासु ह्यांच्या मनांत मोठं कुतूहल असतं. त्यांचा संपन्न जीवनानुभव, असामान्य कल्पकता, त्यांची अव्वल दर्जाची प्रतिभा आणि अस्सल मराठी शब्दकळा यांच्यामुळं त्यांच्या हातून उत्तमॊत्तम कादंबर्या लिहिल्या गेल्या. त्यांना सर्व स्तरांवर मान्यता मिळाली. वाचकांच्या मनांत मोलाच स्थान मिळालं. त्यांच्या लेखनामागचा विचार, निर्मितीच्या कळा, कलाकृतींच्या अभिव्यक्तीचा त्यांनीं घेतलेला शोध ह्यासंबंधीं त्यांनीं गेल्या चाळीस वर्षांमध्यें जें स्फुट लेखन केलं, ते संग्रहरुपानं ‘कहाणीमागची कहाणी’ च्या माध्यमांतून रसिकांसमोर ठेवीत आहें. शितू, पडघवली, कुणा एकाची भ्रमणगाथा, माचीवरला बुधा, मृण्मयी, जैत रे जैत, आम्ही भगीरथाचे पुत्र, मोगरा फुलला या आणि अशा अनेक कलाकृतींच्या निर्मितीमागच्या कहाण्या ह्या संग्रहांत आहेत. त्यांचे मातब्बर साहित्यिकांशी आणि चिकित्सक वाचकांशीं झालेले संवादही इथं संग्रहीत केले आहेत. त्यांतूनही त्यांच्यांतल्या लेखकाचं एक चित्र आपल्या मनांत उमटेल. ‘कहाणीमागची कहाणी’ ही मृण्मयी प्रकाशनाची रसिक चाहत्यांना वैशिष्ट्यपूर्ण भेट आहे.
Added to cart successfully!