Shopping Cart

Your cart is empty now.

Shopping Cart

Your cart is empty now.

आरोग्य आणि समाज   by   P.K.Kulkarni
Rs. 495.00Rs. 550.00

पुस्तकाविषयी थोडेसे....

 

आरोग्य आणि समाज हे पुस्तक आरोग्यक्षेत्रावरचे तसेच आरोग्यक्षेत्रातील सामाजिक संबंधांचे समाजशास्त्रीय विश्‍लेषण करणारे आहे. त्यामुळे हे पुस्तक पदवी व पदव्युत्तर अभ्यास करणारे विद्यार्थी, आरोग्याच्या जाणिवा असणारे वाचक व वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेले डॉक्टर यांना मार्गदर्शक ठरू शकेल.

आरोग्यासंबंधीच्या विविध संकल्पनांचे विश्‍लेषण करताना आहाराचे स्वरूप, सकस व निकस आहार, आरोग्य- संवर्धनात स्वच्छतेचे महत्त्व, पर्यावरण व पर्यावरणप्रदूषण, व्यक्ती, समाज, समुदाय व सरकार यांची आरोग्यरक्षणातील भूमिका, ग्रामीण आरोग्यसेवा योजना यासंबंधीचे सविस्तर विवेचन या पुस्तकात आहे.

शिवाय अन्न व औषध भेसळ,त्याचे स्वरूप, त्यासंबंधीचे कायदे,अन्नातील भेसळीचे स्वरूप दर्शविणारा तक्ता, औषधांचा व बनावट औषधांचा व्यापार, यातील अपप्रवृत्ती, तसेच डॉक्टरी व्यवसायातील अपप्रवृत्ती, ग्राहकसंरक्षण कायदा यावरही या पुस्तकात प्रकाशझोत टाकला आहे.अन्नभेसळीचा तक्ता वाचकांना व विशेषत: गृहिणींना अत्यंत उपयुक्त ठरू शकेल.

आरोग्यसंरक्षणात प्रसारमाध्यमांची भूमिका, आजारामुळे विकलांग झालेल्या रुग्णांचे पुनर्वसन यावरही या पुस्तकात विवेचन केले आहे.

Categories:
Translation missing: en.general.search.loading