Shopping Cart

Your cart is empty now.

Shopping Cart

Your cart is empty now.

Aadhyatmik Vicharatun Aanandamayi Garodarapan By Gopika Kapur, Dr. Arun Mande
Rs. 0.00
बाळाला जन्म देण्याचा आनंद जरी अत्युच्च असला तरी त्याविषयी मनात नाना तऱ्हेच्या शंकाही निर्माण झालेल्या असतात. जसं की, 'गरोदरपणाचे नऊ महिने व्यवस्थित जातील की नाही?’ ‘मला प्रसूतीवेदना सहन होतील का?’ ‘बाळाचं संगोपन आपण उत्तम प्रकारे करू शकू की नाही?’ आध्यात्मिक विचार आणि शास्त्रीय माहिती यांची योग्य सांगड घालत लेखिका गोपिका कपूर त्यांच्या व्यक्तिगत अनुभवांच्या आधारे अशा प्रकारच्या द्विधा मन:स्थितीतील शंका-समस्यांसाठी काही सोपे व विचारपूर्ण मार्ग या पुस्तकात देत आहेत.
*   अनपेक्षित गर्भधारणा 
*   हार्मोन्सचा गोंधळ
*   नातेवाईकांचे अनाहूत सल्ले
*   बाळंतपणानंतरची लैंगिकतेविषयी मानसिकता
*   प्रसूतीच्या पर्यायी पध्दती
*   गरोदरपणात घ्यावयाची शरीराची काळजी आणि गर्भधारणेपासून ते बाळ जन्माला येईपर्यंत सकारात्मक विचार व उल्हसित वृत्ती कशी ठेवावी याचे साधे सोपे पण परिणामकारक उपाय लेखिका सांगते. 
बाळ गर्भाशयात असतानाच त्याचं आईशी एक भावनिक नातं तयार होतं. या पुस्तकामुळे ते नातं दृढ व्हायला नक्कीच मदत होईल.

Click here to be notified by email when this product becomes available.

Translation missing: en.general.search.loading