आयुर्वेदिक उपचारांचा आधार म्हणजे आहार आहे. सगळ्या प्रकारचे रोग हे पचनसंस्थेतनं निर्माण होतात आणि त्याचं कारण म्हणजे अन्नपचन नीट न होणं िंकवा अयोग्य अन्नाचं सेवन करणं. ह्या विश्वासावर आधारित अशी आयुर्वेदिक औषधोपचार- पद्धती निर्माण झाली. योग्य आहारानं आपलं आरोग्य कसं जतन करावं, प्रकृतीचं रक्षण कसं करावं आणि योग्य आहाराने रोग कसे बरे करावेत, या विषयी हे पुस्तक आपल्याशी संवाद साधेल. परिणामकारक अशी आयुर्वेदिक उपचारपद्धती जाणून घेण्यासाठी आणि अमलात आणण्यासाठी हे पुस्तक अतिशय मौल्यवान आणि मार्गदर्शक आहे.