Shopping Cart

Your cart is empty now.

Shopping Cart

Your cart is empty now.

FISH! by STEPHEN C. LUNDIN, HARRY PAUL AND JOHN CHRISTENSEN
Rs. 126.00Rs. 140.00
वातावरणातील सकारात्मक ऊर्जा माणसाची कार्यक्षमता कशी वाढवते, याचा वस्तुपाठ देणारं हे पुस्तक आहे. एका छोट्याशा कथेतून हा वस्तुपाठ दिला आहे. मेरी जेन ही ‘फर्स्ट गॅरंटी फायनांशिअल’ या सिअ‍ॅटलमधल्या प्रथितयश कंपनीच्या ‘ऑपरेशन विभागा’त सुपरवायझर म्हणून काम करत असते. या कंपनीच्या पहिल्या मजल्यावर मेरीच्या हसत-खेळत वागण्यामुळे आणि तिच्या व्यवस्थापन कौशल्यामुळे एकूणच उत्साही वातावरण असतं. त्याच्या विरुद्ध वातावरण याच कंपनीच्या तिसऱ्या मजल्यावर असतं. या मजल्यावरील ऑपरेशन विभागाच्या हातात फर्स्ट गॅरंटीच्या सर्व व्यवहारांचं काम असतं. ‘विषारी ऊर्जेचा कचरा डेपो’ असं संबोधल्या जाणाऱ्या या विभागाची जबाबदारी मेरीवर सोपवली जाते. या विभागातील अकार्यक्षम कर्मचाऱ्यांमध्ये कशी सुधारणा करायची, या विचारात असताना मेरी पाइक प्लेस फिश मार्केटमध्ये जाते आणि तेथील उत्साही वातावरणाने प्रभावित होते. तेथील एक तरुण विक्रेता लोनी हे उत्साही वातावरण तिथे जाणीवपूर्वक निर्माण केल्याचे आणि त्याचे फायदे तिला सांगतो. फिश मार्केटचं हे यशाचं सूत्र मेरी आपल्या विभागाला कसं लागू करते आणि आपल्या कर्मचाऱ्यांमध्ये कसा सकारात्मक बदल घडवून आणते, हे जाणून घेण्यासाठी हे पुस्तक वाचलं पाहिजे.
IMAGINE A WORKPLACE WHERE EVERYONE CHOOSES TO BRING ENERGY, PASSION AND A POSITIVE ATTITUDE TO THE JOB EVERY DAY. IN THIS ENGROSSING PARABLE, A FICTIONAL MANAGER HAS THE RESPONSIBILITY OF TURNING A CHRONICALLY UNENTHUSIASTIC AND UNHELPFUL DEPARTMENT INTO AN EFFECTIVE TEAM. SEATTLE`S PIKE PLACE FISH IS A WORLD FAMOUS MARKET THAT IS WILDLY SUCCESSFUL THANKS TO ITS FUN, BUSTLING, JOYFUL ATMOSPHERE AND GREAT CUSTOMER SERVICE. BY APPLYING INGENIOUSLY SIMPLE LESSONS LEARNED FROM THE PIKE PLACE, OUR MANAGER DISCOVERS HOW TO ENERGISE AND TRANSFORM HER WORKPLACE. ADDRESSING TODAY`S MOST PRESSING WORK ISSUES WITH AN ENGAGING METAPHOR AND AN APPEALING MESSAGE, FISH! OFFERS WISDOM THAT IS EASY TO GRASP, INSTANTLY APPLICABLE, AND PROFOUND.
Translation missing: en.general.search.loading