‘कार्यमग्न, व्यस्त लोकांसाठी योगसाधना’ हे पुस्तक म्हणजे निरोगी प्रकृतीसाठी योग्य मार्गदर्शक होय. विशेषत: ज्या लोकांचे कार्यबाहुल्यामुळे स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते त्यांच्यासाठी हे पुस्तक अत्यंत उपयुक्त ठरते. निरोगी प्रकृतीचे रहस्य काय? निद्रा, व्यायाम, विश्रांती ह्यांचे योग्य प्रमाण, पोषक आहार, शरीरांतर्गत स्वच्छता, हानिकारक व्यसनांपासून दूर राहणे, मन तणावमुक्त राखणे ह्या सर्वांची फलनिष्पत्ती म्हणजे निरोगी प्रकृती. हे निरामय जीवन साध्य करण्यासाठी योगासने, प्राणायाम, षट्कर्म (शुद्धितंत्र), योगनिद्रा आणि ध्यानधारणा ह्यांचा अवलंब करणे अटळ आहे. ही योगसाधना कोणालाही आचरणात आणता येईल अशी साधी, सहज असून रोजच्या दिनक्रमातही तुम्हांला ती पार पाडता येईल.