Shopping Cart

Your cart is empty now.

Shopping Cart

Your cart is empty now.

Resha Ani Rang By V S Khandekar
Rs. 716.00Rs. 795.00

अराजक
'THE ANARCHY'
द ईस्ट इंडिया कंपनी: एका व्यापारी कंपनीचा जुलमी कारभार
अनुवाद रेश्मा कुलकर्णी-पाठारे

१७६५ च्या ऑगस्ट महिन्यात, ईस्ट इंडिया कंपनीने एका
तरुण मुघल सत्ताधीशाला पराभूत केलं. त्याला आपल्या
धनाढ्य प्रदेशांमध्ये नव्या प्रकारचं प्रशासन प्रस्थापित करायला सांगितलं. खासगी लष्कराच्या बळावर जबरदस्तीनं करवसुली करणाऱ्या इंग्रज व्यापाऱ्यांचं हे नवं प्रशासन म्हणजे आजच्या काळातलं 'अनैच्छिक किंवा सक्तीचं खासगीकरण'च.

ईस्ट इंडिया कंपनीव्या पायाभरणीच्या वेळी तयार केलेल्या
सनदीनुसार तिला 'युद्ध सुरू करण्याची मुभा होती.
त्यानुसार, कंपनीने बरेचदा हिंसा व जुलूमाच्या आधारे आपलं
इप्सित साध्य करून घेतलं. मात्र व्यापारी संस्था म्हणून सुरू
झालेली ईस्ट इंडिया कंपनी, हिंदुस्थानच्या राजकारणामध्ये
सक्रिय होऊ लागली, तेव्हा तिचा चेहरामोहरा पार बदलून
गेला. तिचं रूपांतर रेशीम व मसाल्यांचा व्यापार करणाऱ्या
आंतरराष्ट्रीय संस्थेमधून एका आक्रमक वसाहतवादी समांतर
शासनव्यवस्थेत होऊ लागलं. चार दशकांच्या लहानशा
कालावधीत, कंपनीने दोन लाख माणसांना प्रशिक्षण देऊन
स्वतःचं अद्ययावत लष्कर उभं केलं होतं. आश्चर्याची गोष्ट
अशी की, इंग्रज सरकारचं लष्कर यापेक्षा अर्ध्या
मनुष्यबळावर चालवलं जात होतं. लष्करी बळाचा पुरेपूर
वापर करून, ईस्ट इंडिया कंपनीने आधी बंगाल, आणि मग

१८०३ साली मुघल राजधानी असलेलं दिल्ली आपल्या
ताब्यात घेत, संपूर्ण हिंदुस्थानावर स्वतःची पकड घट्ट केली.
लंडनस्थित कार्यालयातून, कंपनी देश चालवू लागली!
जगातील सर्वश्रेष्ठ आणि बलाढ्य साम्राज्यांपैकी एक असलेलं
मुघल साम्राज्य मोडकळीस आलं. त्याच्या जागी, साता
समुद्रापलीकडे हजारो मैल दूर असणाऱ्या व्यापारी कंपनीने
आपला जम बसवला. मुघल साम्राज्य मोडकळीस आणणारी
ही व्यापारी कंपनी लहानशा कार्यालयात वसलेली होती. त्या
कार्यालयाला फक्त पाच खिडक्या होत्या.

हे कसं घडलं, याची रोमांचकारी कथा म्हणजे 'अराजक'
(द अनार्की)! लेखक विल्यम डॅलरिंपल यांनी ईस्ट इंडिया
कंपनीचे रोमांचक पैलू उलगडून दाखवले आहेत. आपल्या
या लेखनाद्वारे, डॅलरिंपल यांनी जगातील प्रथम 'कॉर्पोरेट
पॉवर'चा उगम व विकास दाखवून, त्यामधून आजच्या
काळात आपण काय घडे घेतले पाहिजेत, हेही सविस्तर
समजावून सांगितलं आहे.

Categories:
Translation missing: en.general.search.loading