Your cart is empty now.
शं. रा. देवळे लिखित ‘जगातील महान व्यक्ती’ या पुस्तकात विश्वातील अत्यंत नामवंत अशा दहा व्यक्तींच्या खडतर जीवनाचा वेध घेऊन त्यांच्या वेगळ्या पैलूंवर प्रकाशझोत टाकला आहे. सॉक्रेटिस, कोलंबस, इसाप, गॅलिलिओ, कॉन्फयुशिअस, टॉयस्टॉय यांसारख्या जगप्रसिद्ध व्यक्तींनी साध्या बाबतींतून आपला ठसा उमटवला. याचे चरित्र वर्णन साध्या-सोप्या भाषेत व सुटसुटीत वाक्यरचनेद्वारे लेखकाने प्रस्तुत पुस्तकात केलेले आहे. हे पुस्तक प्रत्येक विचारवंताच्या जीवनकार्याला उलगडून दाखवताना आपण समस्येला कसे सामोरे जावे, याची सहज शिकवण देऊन जाते. या पुस्तकाची रचना गोष्टीस्वरूप असली तरी सर्व वयोगटांसाठी उपयुक्त व ज्ञानवर्धक अशी आहे.प्रत्येकाने वाचावे आणि प्रत्येकाच्या संग्रही असावे असे हे पुस्तक!
Added to cart successfully!