Your cart is empty now.
संभाजी महाराजांच्या निधनानंतर औरंगजेबाचा सरदार झुल्फिकार खान याने रायगडाला वेढा दिला. प्रत्यक्ष राजधानीच संकटात असल्यामुळे मराठ्यांचे राज्य बुडणार की काय, अशी शंका निर्माण झाली होती. परंतु महाराणी येसूबाई यांनी संभाजी महारांचे धाकटे बंधू राजाराम महाराज यांचे मंचकारोहण केले व त्यांना रायगडावरून सुरक्षितरित्या बाहेर जाण्यास सांगितले. स्वराज्य अबाधित राहावे, याच एकमेव हेतून छत्रपती राजाराम महाराज रायगडावरून बाहेर पडले. काही निवडक विश्वासू सरदारांसह महाराज प्रतापगड, पन्हाळगड मार्गे दक्षिणेमध्ये उतरले व त्यांनी प्रदीर्घ प्रवासानंतर जिंजीचा किल्ला गाठला. मुघलांनी त्यांचा पाठलाग करूनही ते त्यांच्या तावडीत कधीच सापडले नाहीत. पुन्हा एका अवघड प्रसंगी छत्रपती शत्रूच्या वेढ्यातून सुखरूप बाहेर पडले होते.
Added to cart successfully!