Your cart is empty now.
‘विकासा’चे दोन मार्ग आहेत. पहिला आहे, विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्या आधारे उत्पादन आणि उपभोग यामध्ये सातत्यानं करण्याच्या वाढीचा. ह्या ‘अमेरिकी’ मार्गाचे तीन पुरस्कर्ते : सावरकर, नेहरू आणि कलाम. दुसरा मार्ग आहे, तो उत्पादन आणि उपभोग ह्यांचं मान इष्टतम ठेवून, आंतरिक विकासावर भर देणारा. ह्या ‘आध्यात्मिक’ मार्गाचे चार पुरस्कर्ते : विवेकानंद, गांधी, विनोबा आणि अरविंद. पहिला मार्ग ‘विकासा’चा नाहीच. तो मानवासह सृष्टीला विनाशाकडे नेतो. त्यामुळे, भारताची वाटचाल दुसऱ्या मार्गानंच झाली पाहिजे. वरील सात जणांच्या विकासविषयक विचारांचं खंडनमंडन करत, भारताच्या भावी विकासाच्या वाटेचा शोध घेणारा; चार दशकांच्या अखंड चिंतनातून साकारलेला ग्रंथ.
Added to cart successfully!