Your cart is empty now.
कोणत्याही रंगभूमीला ऐतिहासिकतेचे भान असले पाहिजे. त्याने दिशा स्पष्ट होतात. पुढचा मार्ग सुकर होऊ शकतो. हे पुस्तक तसे परिप्रेक्ष्य देऊ पाहते. साठोत्तर प्रायोगिक-समांतर मराठी रंगभूमीचे केवळ साक्षी नव्हे, तर निरनिराळ्या नात्याने प्रत्यक्ष सहभागी असलेले प्रतिभावान रंगकर्मी माधव वझे या विस्तृत परिप्रेक्ष्याचे दर्शन घडवत आहेत. त्यांनी अनेक संदर्भबिंदूंच्या मदतीने ‘पल्याड’ (एकोणीस-विसाव्या शतकातील युरोप, अमेरिका व रशिया) अन् ‘अल्याड’ (वीस-एकविसाव्या शतकातील प्रायोगिक-समांतर मराठी रंगभूमी) यांचा घेतलेला अभ्यासपूर्ण वेध.
Added to cart successfully!