Shopping Cart

Your cart is empty now.

Shopping Cart

Your cart is empty now.

Dostar by Chakor Shah  दोसतार लेखक - चकोर शाह
Rs. 288.00Rs. 320.00

तीन शाळकरी मित्रांच्या माध्यमातून, जीवनाचे वेगवेगळे पदर उलगडत आनंदी शिक्षणाचे महत्व पटवून देणारी कादंबरी. कादंबरीची सुरवात हि मुख्य नायक विन्या म्हणजे विनायक याच्या प्रवासाने होते आणि हाच प्रवास आपल्याला त्याच्या गेल्या वर्षभरात घडलेल्या काही गमतीशीर तर काही हृदय स्पर्शी घटनांची मजेशीर पण उद्बोधक सफर घडवतो.  

     दोसतार ही तशी पहिली तर शाळेतल्या मुलांची कथा. पण ही कादंबरी लिहीली आहे ती मुलांच्या भावविश्वात जाऊन त्यांच्या दृष्टीतून वाचत असताना आपण त्यांच्या वयाचे होतो. आपले लहानपण पुन्हा अनुभवतो. ही कादंबरी आहे ती तुमच्यात जागृत असलेल्या लहान मुलासाठी.

    रोजच्या वागण्यातुन होणारे विनोद , गमतीजमती आपल्याला आंतर्मुख करतात. खरे तर हे पुस्तक केवळ मुलांसाठी नाही तर पालकांसाठी आहे , शिक्षकांसाठी आहे. शिक्षण -आनंद शिक्षण व्हावे  हे रविंद्रनाथ टागोरांच्या भावविश्वातले जग आपल्यासमोर खुलत जाते.  विनायक  शाळेत शिकत असताना आपण  नकळत त्याच्या जागी जाऊन बसतो. आणि शाळेत जे शिकलो ते पुन्हा एकदा अनुभवतो. त्यातील उद्देश आत्ता समजतो.( खास करून ४०/४५ वयाच्या वाचकांना)   

   शिक्षणाने खरे तर मुलाचा सर्वांगीण विकास व्हावा . त्यांचे भाषा कौशल्य वाढावे,चिकीत्सकपणा, नवीन काही करुन पहाण्याची उर्मी,  खेळ भावना , मॅनेजमेंट स्किल्स , संघ भावना , निर्णय क्षमता,  वाढावी हे अपेक्षीत असते.   मार्काच्या मागे लागत,   नेमका त्यालाच फाटा दिला जातो.

    शिकणे म्हणजे केवळ घोकंपट्टी किंवा नुसता सराव करत   बसणे नाही. तर शिकताना त्यात समरस होत त्या शिक्षणातला आनंद घेता आला तर ते  कधीच ओझे किंवा कंटाळावाणे होत नाही.  ही जाणीव मुलांनाच नव्हे तर पालकांना आणि शिक्षकांनाही असावी. या सर्व गोष्टी पुस्तकात वेळोवेळी येतात. पण विन्याच्या वर्गात झालेल्या  गमतीदार घटनांमुळे  विनोदी पद्धतीने. रोजच्या घटनांमधून. वाचकाला नकळत जाणीव करुन देतात.

Categories:
Translation missing: en.general.search.loading