Your cart is empty now.
आखाती देशांत जायचे, भरपूर पैसे कमवायचे आणि मायदेशातल्याकुटुंबियांना सुखात ठेवायचे या आकांक्षेने तिथे जाणाऱ्या लाखोलोकांपैकी एक म्हणजे केरळात मजुरी करणारा नजीब. त्याची आखातीआकांक्षा सफल झाली की स्वप्नरूपातच राहिली ?त्याला अनेक संकटांचा सामना करावा लागला. कधी निसर्गाने तर कधीमानवाने, प्राणच पणाला लावले. त्यातूनही तो निभावून गेला, कसा?कोणत्या श्रद्धांमुळे? जसा होता तसा राहिला की ?मानवी आयुष्याची संभवनीय परिवर्तने आणि मूलभूत मूल्ये, यांचेचित्तवेधक दर्शन या कादंबरीत घडते.‘गोट डेज’ मल्ल्याळी भाषेत प्रकाशित झाली आणि अल्पावधीतबेस्ट सेलर या वर्गात मोडली जाऊ लागली. मल्ल्याळी साहित्यातील एकअत्यंत तेजस्वी असे व्यक्तिमत्व म्हणजे बेन्यामिन. त्यांची उपरोधीक आणिप्रसंगी हळुवार होणारी शैली नजीबच्या आयुष्याची वाळवंटी वंचना,बघता बघता, एकाकीपणा आणि परकेपणा, यांचे वैश्विक परिणाम कसेबनते ते समर्थ रीतीने उभे करते.या पुस्तकाच्या मल्याळम आवृत्तीच्या तीन लाखाहुन अधिक प्रतींचीविक्री झालेली आहे.
Added to cart successfully!