Shopping Cart

Your cart is empty now.

Shopping Cart

Your cart is empty now.

Rs. 405.00Rs. 450.00
कोहजाद म्हणजे विद्रोह. स्वतःच्या भूभागासाठी भूमिपुत्रांनी चालवलेला लढा हा या कादंबरीचा आत्मा आहे. पाकिस्तानकडून सातत्याने गळचेपी होणाऱ्या बलुच बांधवांनी आपल्या स्वातंत्र्यासाठी पुकारलेला एल्गार. पानिपत युद्धानंतर बंदी बनविण्यात आलेल्या मराठ्यांच्या वंशजांनी आपल्या रक्तातील लढाऊ बाणा आजही जिवंत ठेवत, हा लढा किती मोठ्या प्रमाणावर चालवला आहे यावर कादंबरीचे कथानक आधारले आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडी, आखाती तेलाचे चटके आणि त्यात धार्मिक युद्धे यांनी काठोकाठ भरलेली ही कादंबरी तुम्हाला नक्कीच विचार करायला भाग पाडणारी आहे. हा विद्रोह केलाय आपल्याच नैसर्गिक संपत्तीला, शिक्षण यांना मुकलेल्या भुमीपुत्रांनी...बलुचिस्तानच्या सुपूत्रांनी. बलुचिस्तान एक पाकिस्तानचाच भाग...पण पाकिस्तान त्यांना कायम सावत्रपणाने वागवत...कायम मागासलेले ठेवण्याचा प्रयत्न करी... या अन्यायाविरुद्ध आवाज उठवायला कोणी ना कोणी युद्धा तर उभा राहणारच...कारण संघर्षातील शेवट हा पुढील पिढ्यांना लढण्यासाठी प्रेरणा देणारा असतो...आणि हा अन्यायाविरुद्ध संघर्ष उभारला तो 'अकबर खान बुग्ती' यांनी. खान बाबांनी उभारलेला संघर्ष हा बलुचिस्तानच्या तरूणांना प्रोत्साहन देणारा तर होताच आणि लढता लढता मरण पत्कारावे लागले तरी खानबाबांच्या संघर्षाची प्रेरणा घेऊन अनेक नवे योद्धे बलुचिस्तानच्या या भुमीसाठी, तिला स्वातंत्र्य करण्यासाठी तयार होतेच...
Categories:
Translation missing: en.general.search.loading