Your cart is empty now.
Mahamaya Nilavanti By Sumedh महामाया निळावंती लेखक सुमेध
४०० वर्षांपूर्वी निळावंती सह्याद्रीच्या जंगलात राहायची. बाजिंद्याने स्वतःच्या फायद्यासाठी निळावंतीशी लग्न केलं. तिच्याकडून पशुपक्ष्यांची भाषा शिकून घेतली. स्वार्थासाठी तिचा वापर करून घेऊन नंतर तिचा खून केला. सह्याद्रीच्या खोऱ्यात बाजिंदा आणि निळावंतीची प्रेमकथा अजूनही चवीने सांगितली जाते. ह्या निळावंतीची पोथी कुप्रसिद्ध आहे. जो वाचतो त्याला एक तर वेड तरी लागतं किंवा त्याचा मृत्यू तरी होतो.
अलीकडच्या काळात, १९९२साली घडलेली एक अजब घटना. एक बाप निळावंतीची पोथी शोधत सह्याद्रीच्या जंगलात येतो. त्याच्यासोबत आहे त्याच्या मुलाचा बर्फात अन मिठात ठेवलेला मृतदेह. ह्या जतन केलेल्या मृतदेहाला जिवंत करण्यासाठी बाप जंगजंग पछाडतो. शेवटी त्याला अनपेक्षितरित्या जंगलात साक्षात निळावंतीचं अस्तित्व सापडतं. बाप आपल्या मुलाच्या मृतदेहाला जिवंत करू शकतो का? वनदेवता निळावंती अजूनही अस्तित्वात आहे का? तिची भाषा म्हणजे कोणती भाषा? निळावंती जर आजही अस्तित्वात असेल तर चारशे वर्षांपूर्वी ती मेली नव्हती का? बाजिंद्याने निळावंतीचा खून केला नव्हता का? तिचा खून कोणी केला होता? खून होऊनही निळावंती जिवंत कशी राहिली? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आहेत, ‘महामाया निळावंती’त.
अठरा पौराणिक पोथ्या, अनेक ऐतिहासिक दस्तऐवज, तांत्रिक आख्यायिका व निळावंतीच्या दंतकथांचा अभ्यास करून लेखक सुमेध ह्यांनी निर्माण केलेली ही अद्भुत, जादुई, थरारक व मेंदूसोबत खेळणारी मेटाफिक्शन कादंबरी.
Added to cart successfully!