Your cart is empty now.
Marmbhed मर्मभेद by Shashi Bhagwat शशी भागवत
सम्राट चंद्रकेतु महाराज, वीरभद्र आदि सर्व लोकांच्या नेत्रात कमालीची उत्सुकता दिसू लागली. तेजस्विनीचे हृदय धडधडले. तिचे चित्त कावरेबावरे झाले. आपला प्रियकर कोण असावा याबद्दल ती नेहमीच घोटाळ्यात पडत असे. आज आता तो क्षण आला होता नेत्रात प्राण आणून तेजस्विनी त्या योध्दयाकडे पाहू लागली.
त्या योध्दयाने शांतपणे आपल्या मुखावरील पटल दूर केले. त्या मुखपटलाआड लपलेला त्याचा तेजस्वी आणि सुंदर चेहरा दृष्टीस पडला; मात्र.... अचानक विद्युत्पात होऊन त्याच्या प्रखर तेजाने स्थळकाळाची शुद्ध हरपावी तसा प्रकार तेथे घडला. स्वतः कृष्णान्त पावलाखालील धरित्री अचानक फाटावी तसा दचकून मागे धडपडला. "युवराज कुणाल?" कृष्णान्त अविश्वासाने ओरडला. "युवराज कुणाल..." सम्राट महाराजांना तो धक्का अनपेक्षित होता. आनंदातिशयाने क्षणभर त्यांना मूर्च्छा आली
"युवराज.." तेजस्विनीचे मुख क्षणभर निस्तेज बनले. तथापि, दुसऱ्याच क्षणी तिच्या सुंदर चेहऱ्यावर लज्जेने रक्तिमा फुलविला. वीरभद्राच्या नेत्रांत अश्रू दाटून आले. "होय; युवराज कुणाल !" तो योद्धा शांतपणे म्हणाला. "परंतु निर्बल, बुद्धिहीन आणि निस्तेज युवराज नव्हे." "अशक्य... अशक्य..." कृष्णान्ताचा अद्यापही विश्वास बसत नव्हता.
Added to cart successfully!