Shopping Cart

Your cart is empty now.

Shopping Cart

Your cart is empty now.

Pavanedon Payancha Manoos पावणेदोन पायांचा माणूस BY श्रीकांत बोजेवार  Shrikant bhojewar
Rs. 216.00Rs. 240.00

Pavanedon Payancha Manoos पावणेदोन पायांचा माणूस BY श्रीकांत बोजेवार  Shrikant bhojewar 

गरीब घरचा आणि जन्मतः एक पाय तोकडा असलेला ‘लंगड्या’ बुद्धीने मात्र व्यवहार-चतुर आणि धूर्त आहे. या हुशारीच्या साहाय्याने त्याने त्याच्या व्यंगावर मात केली आहे. अभ्यासात अजिबात न चालणारं त्याचं डोकं व्यवहारात मात्र तेजीत चालतं. यातूनच त्याची यशस्वी होण्याची आणि लोकांना तालावर नाचवण्याची महत्त्वाकांक्षा वाढत जाते आणि ती पूर्ण करण्यासाठी त्याला मदत करत असतं एक मांजर ! हे मांजर लोकांच्या घरी गुपचूप घुसून त्यांच्या ‘खासगी’ बातम्या त्याला पुरवतं… आणि त्या जोरावर गावपातळीवरून सुरू झालेला लंगड्याचा प्रवास आमदार तयार करणारा ‘किंगमेकर’ इथपर्यंत पोहोचतो… पण मग अशा काही घटना घडतात की त्याच्या आयुष्याला वेगळीच कलाटणी मिळते… शेवटी, लंगड्याची ही कथा अनेक प्रश्न निर्माण करते… लंगड्या भौतिक यशोशिखराला पोहोचतो की नैतिक अधःपतनाला ? माणसाच्या चकचकीत यशाखाली काय काय दडवलं गेलेलं असतं? महत्त्वाकांक्षेपायी माणूस कोणत्या थराला जाऊ शकतो? नैतिक आणि अनैतिक यांच्या सीमारेषा कुठे संपतात, कुठे सुरू होतात? मानवी जगण्याच्या अतर्व्यतेवर ब्लॅक कॉमेडीच्या माध्यमातून भाष्य करणारी, बौद्धिक रंजन करत खिळवून ठेवणारी विलक्षण कादंबरी… पावणेदोन पायांचा माणूस !

Categories:
Translation missing: en.general.search.loading