Shopping Cart

Your cart is empty now.

Shopping Cart

Your cart is empty now.

Saatmainche Raan - Part 2  सातमाईंचे रान भाग २ by Ida Barretto आयडा बॅरेटो
Rs. 809.00Rs. 899.00

Saatmainche Raan - Part 2  सातमाईंचे रान भाग २ by Ida Barretto आयडा बॅरेटो 

'सातमाईंचे रान' ही एक वेगळी, एका जागृत देवस्थानाविषयी कादंबरी आहे
आणि ती ह्या दुसऱ्या भागात खोताच्या सरस्वतीने पूर्ण केली. सर्वांना वाटले,
'चला, सातमाईंचे अस्तित्व जगापुढे येऊन ती कादंबरी पूर्ण झाली.' तर तसे
घडले आहे का? कारण देवाच्या अस्तित्वाला शेवट किंवा पूर्णविराम नसतो, तर
पूर्णत्व असते. त्यामुळे कदाचित असेदेखील घडले असेल, की त्या खालच्या
जागृत सातमाई कडूलिंबाच्या झाडाच्या पारावरून खोताच्या वाड्यात आल्या.

पुनर्जन्म घेऊन आलेली अंबाआजी, आनंदीआत्या व इरलीकाकूंच्या
सखारामबरोबर ते सर्व जण त्या सातमाईंच्या वाड्यात एकत्रच राहिले का?
तसेच आयुष्याच्या अर्ध्या वाटेवरून उठून गेलेले, मोक्षप्राप्ती न मिळता
अडकलेले आराकाकांचे कुटुंब, तो धनलोभी मुंगळ्या व किन्नाकाका हे
सर्व जण आपल्या मोक्षप्राप्तीसाठी पुन्हा परत येतील का? हे सर्वच प्रश्न न
उलगडणारे असले, तरी ते कदाचित उलगडले जातील किंवा जाणारही नाहीत.
सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ही कादंबरी खोताची सरस्वती पुन्हा लिहील का?

हे सर्व आता सातमाइच ठरवतील. आता त्या न उलगडणाऱ्या प्रश्नांचे
उत्तर कधी मिळेल, ह्याची आपण प्रतीक्षा करू या कारण प्रतीक्षेचे फळ नेहमी
मधुर असते

Translation missing: en.general.search.loading