Shopping Cart

Your cart is empty now.

Shopping Cart

Your cart is empty now.

Rs. 280.00Rs. 300.00

कृषी-परंपरेतल्या बहुजनांच्या आणि त्यातल्या जराश्या उच्च स्थानावर बसलेल्या किंवा फलाण्या जातीत जन्म घेतल्यामुळे आपण उच्च स्थानावरच आहोत, असं समजून वागणाऱ्या माणसांच्या आत असलेले मानसिक-सामाजिक-सांस्कृतिक आणि राजकीय गंड यांना हात घालणाऱ्या कथा या संग्रहामध्ये बहुसंख्येने आहेत. आपलं वर्तमान केवढं अशक्त आहे, यापेक्षाही आपला इतिहास केवळ दिव्य होता हेच सांगण्यात ज्यांना कृतकृत्यता वाटते, किंवा आपण स्वतः किती कर्तृत्वहीन आहोत ही गोष्ट साफ नजरेआड करून आपल्या पणजोबांच्या काळात आपल्या गढीवरून केवढी जबरदस्त सरदारी होती, याच्या खऱ्याखोट्या कथांमध्ये रमून त्या सरदारीचे अवशेष विकून खात राहणं आणि त्यालाच 'खानदानीपण' म्हणत राहणं, यातलं विदारकत्व राजाभाऊ, विनोदाच्या उपरोधाच्या उपहासाच्या माध्यमातून दाखवायला लागतात, तेव्हा ते सामाजिक अंगानेही फार महत्वाचं वाटत राहतं. मराठी साहित्यात मानसपुत्रांची मोठी परंपरा आहे. बाळकराम आणि तिबूनाना किंवा चिमणराव आणि गुंड्याभाऊ वगैरे अतिशय प्रसिद्ध जोड्यांमध्ये या गढीवरून प्रकटत असलेली 'राजाभाऊ' आणि 'तंबूशेठ' ही जोडीही नक्कीच एक वेगळा आणि स्मरणीय ठसा उमटवणारी आहे. एकुणातच या संग्रहाच्या निमित्ताने 'गढीवरून' उतरून एक सशक्त अशी कथात्मक अभिव्यक्ती साहित्याच्या प्रदेशात प्रवेश करत आहे. वाचकांनी उत्सुकतेने स्वागत करावं, असंच हे कथन आहे.

Translation missing: en.general.search.loading