Your cart is empty now.
प्रस्तुत ‘खेळीमेळी’ ही, म्हटले तर अभिनव पण खरे तर अपेक्षितच, अशी प्रा. रा. ग. जाधव यांची ओळख आहे. ललित आणि मननीय अशा उभयविध स्वरूपाचे हे बहुरंगी ललित गद्य आहे. वाऱ्यासवे इतस्तत: विखुरली जाणारी बीजे कधी कधी रुजतात व मग कुठे कुठे रंगीबेरंगी फुलांच्या रूपाने स्वत:च चकित होऊन डोलू लागतात, बोलू लागतात. ‘खेळीमेळी’ म्हणजे या प्रकारचा अ-मोसमी फुलोरा आहे. ‘मी’ व ‘मी’चे अनुभव, लेखन, वाचन, चिंतन हेच या खेळीमेळीच्या प्रसन्न आत्माविष्काराचे आशय-विषय आहेत. या ‘मी’च्या अवकाशात गांभीर्य व लालित्य, मनस्वीपणा व मननीयता ही एकत्रच राहतात, एकत्रितच फुलतात. प्रा. जाधव यांच्यातील संवादोत्सुक पण चिंतनशील समीक्षक या
लेखनातही जाणवतो; पण इथे तो आहे खेळीमेळीच्या ललित मैफलीत! या मैफलीत रसिक वाचकांना मुक्त प्रवेश आहेच आहे...!
Added to cart successfully!