५० आयकॉनिक पर्सोनालिटीज (50 Iconic Personalities) पुस्तकाबाबत
आपल्या अद्वितीय कामगिरीमुळे समाजमनात अढळ स्थान प्राप्त केलेल्या तसेच समाजाचे दिशादर्शक म्हणून मोलाची भूमिका बजावणाऱ्या निवडक ५० कर्तृत्वान व्यक्तींचा कार्यगौरव
शास्त्रज्ञ, गणितज्ञ, समाजसेवक, कृषी व पर्यावरण तज्ज्ञ, उद्योजक, पत्रकार, राजकारणी, सनदी अधिकारी, अर्थतज्ज्ञ, बँकर, विमा तज्ज्ञ, खेळाडू, गिर्यारोहक, कायदेपंडित, चित्रपट व नाट्य दिग्दर्शक, अभिनेते, चित्रकार, स्थापत्यकार, समीक्षक, शेफ, माध्यमतज्ज्ञ, ललित लेखक, इतिहास व तत्वज्ञानाचे अभ्यासक,हवाई अभियंता, आहारतज्ज्ञ अशा विविध क्षेत्रातील सिद्धहस्त व्यक्तिमत्त्वांचा जीवनपट, कार्यपरिचय, व त्यांना मिळालेले सन्मान,पुरस्कार अशा उपयुक्त माहितीचा समावेश
गेली तीन दशकांहून अधिक काळ दूरचित्रवाणी आणि प्रसारमाध्यम क्षेत्रात कार्यरत डॉ. केशव साठये यांनी सामान्य ज्ञानाला आपल्या अनुभवसंपन्न शैलीची जोड देत केलेले अभ्यासपूर्ण लेखन
विविध स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी, सामान्यज्ञान तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घडामोडींमध्ये रुची असणारे वाचक, संशोधक, विविध शाळा -महाविद्यालयांचे शिक्षक, प्राध्यापक, पत्रकारिता, राज्यशास्त्र आदी सामाजिक शास्त्रांचे विद्यार्थी, विश्लेषक आदींसाठी मौलिक संदर्भपुस्तक
लेखकाबाबत :
डॉ. केशव साठये डॉं. केशव साठये हे गेली तीन दशकांहून अधिक काळ दूरचित्रवाणी आणि प्रसारमाध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. प्रथम दूरदर्शन आणि त्यानंतर बालचित्रवाणी माध्यमातून त्यांनी ५००हून अधिक दूरचित्रवाणी माहितीपट,मालिकांची निर्मिती केली आहे . राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांच्या थेट प्रसारणातही ते सहभागी झाले आहेत. ‘माध्यमव्यवस्थापन’या विषयात त्यांनी पुणे विद्यापीठाची डॉक्टरेट पदवी संपादन केली आहे .सकाळ’ दैनिकासाठी समाज -माध्यम आणि शिक्षण याविषयावर ते नियमित लेखन करत असतात. महर्षी कर्वे स्त्रीशिक्षण संस्थेच्या स्मार्ट मिडिया स्कूलचे संस्थापक- संचालक म्हणून त्यांनी ४वर्षे काम केले आहे . सध्या ते माध्यम शिक्षण संस्थेत अभ्यागत प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत तसेच टिळक महाराष्ट्र विद्यापीठात संज्ञापन या विषयाचे Ph.D.चे मार्गदर्शक आहेत.