Your cart is empty now.
प्रिय सुहृद, आजवर मी माझ्या आप्तमित्रांना आणि सुहृदांना असंख्य पत्र पाठवली. माझ्या मनातली गोष्ट सांगायला मला पत्राइतका छान दुसरा कोणताच मार्ग सुचत नाही. ही सगळी पत्र म्हणजे एका प्रकारे माझा हृदयसंवाद आहे. मैत्री ह्या भावनेबद्दल खूप बोललं आणि लिहिलं गेलं आहे. मैत्रीला अनेक कडूगोड पैलू असतात म्हणे; मला मात्र माझ्या मित्र-मैत्रिणींकडून अपरंपार प्रेमच मिळत आलेलं आहे, अगदी निरपेक्ष, निस्वार्थ प्रेम. खरं सांगायचं तर हे सर्व सुहृद आहेत म्हणून मी आहे. I exist in relations. त्यांच्या स्नेहातूनच मला वाटणारी कृतज्ञता मी शब्दांतून कशी व्यक्त करणार?
Added to cart successfully!