आशिष चोप्रा त्यांच्या व्यापक वैयक्तिक अनुभवातून कृतिप्रवण होण्याची अंतर्दृष्टी आणि दर्जेदार परिणामांसाठी विस्तृत रूपरेषा देतात. – नीर एयाल, ‘हूक्ड’ आणि ‘इनडिस्ट्रॅक्टेबल’या बेस्टसेलिंग पुस्तकांचे लेखक आशिष चोप्रा कथाकथन कौशल्यात पारंगत आहे.
थोडक्यात सांगायचं तर त्याची कामगिरी व्हायरल होण्यासाठीच तो जन्माला आला आहे. – रमीत अरोरा, सीओओ (डिजिटल बिझनेस), हिंदुस्थान टाइम्स व्हायरल मार्केटिंग ही योगायोगाने घडलेली आनंदाची गोष्ट नसावी.
आशिष चोप्रा यांच्या पहिल्या व्हायरल झालेल्या व्हिडिओचे चित्रीकरण जवळजवळ नगण्य खर्चात पार पडले होते आणि यासाठी उपकरणांचा वापरदेखील काटकसरीने करण्यात आला होता. तरीसुद्धा, आज त्यांच्या कंटेंटला 35 कोटींपेक्षा जास्त दर्शक लाभले आहेत. त्यांनी कंटेंट मार्केटिंग हे क्षेत्र काबीज करून त्यावर झेंडा फडकवला, यावर उद्योगक्षेत्रातील दिग्गजांनी शिक्कामोर्तब केले आहे.
काही महत्त्वपूर्ण मुद्दे : आशयाच्या सागरात प्रेक्षकांचे लक्ष कसे वेधून घ्यावे; कंटेंट पाहत असताना लोकांना खिळवून कसे ठेवावे; (कारण दर्शक विकत घेता येतात; पण लोकांना खिळवून ठेवणे मात्र प्रयत्नाने साध्य करावे लागते) कथनकौशल्य हे निर्मिती खर्चावर कशी मात करते; (तसेच निर्मिती प्रक्रियेमध्ये पडद्यामागे घडणाऱ्या घटनांबाबत काही महत्त्वाच्या सूचना आणि युक्त्या) तुमच्या पर्सनल ब्रँडची निर्मिती कशी कराल; (आणि नोकरीची असुरक्षितता कशी संपवाल).
अत्यल्प खर्चात लाखो लोकांपर्यंत पोहोचण्याचे स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला, उद्योजकाला, ब्लॉगरला, मार्केटिंग मॅनेजरला किंवा नेतृत्व करू पाहणाऱ्याला, सातत्याने व्हायरल यश कसे मिळवावे, यासाठी अचूक मार्गदर्शन करणारे पुस्तक.