सर्वसाधारणपणे असा एक समज रूढ आहे, की फक्त बुद्धिमान माणसं आणि अभ्यासात उत्तम गुण मिळवणारे विद्यार्थी यांनाच उज्ज्वल भवितव्य असतं. परंतु लेखकाच्या मते हा समज पूर्ण चुकीचा आहे! ते म्हणतात, ‘‘असं मुळीच नव्हे! बुद्धि नाही, असं कुणीही नसतं; फक्त काही लोकांना बुद्धिमान कसं व्हावं, याची नस सापडलेली नसते, एवढचं!’’ माणसानं आयुष्यात आपल्या समोर ठाकलेल्या प्रत्येक प्रसंगाला केवळ इच्छाशक्तीच्या बळावर धैर्याने आणि आत्मविश्वासानं कसं तोंड द्यावं, हेच ‘आत्मविश्वासाचा कानमंत्र’ या पुस्तकात सांगितलेलं आहे. मनात दृढ आत्मविश्वास निर्माण करण्याचा एक निश्चित, सुस्पष्ट आणि विचारपूर्ण मार्ग लेखकानं दाखवलेला आहे.