``सतत शिकणे अन् मिळालेले ज्ञान वाटून घेणे यावर माझा पूर्ण विश्वास आहे. मी जे पाहते, ऐकते, वाचते त्यातील जे मला अस्वस्थ करते, त्याबद्दल लिहिणे हे माझे कर्तव्य आहे असे मला वाटते. विशेषत: स्त्री आणि तरुण यांच्या सक्षमीकरणासाठी सर्वांनी सजग राहून कृती करायची गरज आहे. लेखणीची ताकद वापरून, सामान्यांचा आवाज जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी हाती निशाण धरायचे काम मी यापुढेही करत राहीन.`` डॉ. किरण बेदी यांनी वेळोवेळी वेगवेगळ्या प्रश्नांवर लिहिलेल्या लेखांचे हे संकलन, वाचकांना स्त्रीप्रश्नांबद्दल संवेदनशील करेल आणि प्रतिसाद द्यायला, कृती करायला उद्युक्त करेल.