आध्यात्मिकता - जीवन, अस्तित्व आणि सत्य, यांचे सार हेच! आध्यात्मिक शोध, हे आपले अंतिम ध्येय होय. आपल्या अस्तित्वामागील सत्याचा, जीवनाच्या प्रयोजनाचा आणि अंतिम सत्याला त्याच्या मूळ स्वरूपात पाहण्याचा, हा एक आंतरिक शोध आहे. ही अंतर्मनातली शोधयात्रा लेखकाने सहजसोप्या शब्द व संकल्पनांच्या माध्यमांतून मांडली आहे. या सत्यशोधनयात्रेत आपली अधिकाधिक प्रगती व्हावी, या दृष्टीने काही साधने व तंत्रेदेखील त्यांनी सांगितलेली आहेत.