आरोग्यासाठी आणि शारीरिक तंदुरुस्तीसाठी सोप्पा, साधा, सुरक्षित आणि कमी खर्चिक असा एकमेव मार्ग म्हणजे "चालणे". तुम्ही हा व्यायाम कुठेही, केव्हाही करु शकता. याच्यासाठी गरजेची आहेत फक्त चांगल्या प्रतीची पायताणं. प्रत्येक वयातील व्यक्तींसाठी, तसेच आजारातून नुकतेच बरे झालेल्यांसाठीही "चालणे" हा सर्वांगसुदर व्यायाम आहे. हे पुस्तक तुम्हाला योग्य काळजी व आदर्श आहार या गोष्टी सांभाळून आपले चालणे कसे वाढवायचे यावर उत्तम मार्गदर्शन करते.