रोजच्या धकाधकीच्या जीवनात काही घटना, प्रसंग, परिस्थिती अगदी गोंधळवून टाकणारे असतात. अपेक्षेप्रमाणे तर्वÂसंगत काहीच घडत नाही असे वाटते. अशा अतक्र्य वाटणाNया घटनांमागेही एक प्रकारची संगती असते. ज्योतिषविद्येच्या परिचयातून ही संगती उलगडू शकते. त्यासाठी आवश्यक असणारी ज्योतिषविद्येच्या प्रत्येक अंगाची मुद्देसूद माहिती सोप्या भाषेत या पुस्तकात मांडलेली आहे. याद्वारे संभाव्य अडचणींना तोंड देण्याची मानसिक तयारी करता येते. तसेच प्रत्येक परिस्थिती पालटते या जाणीवेने संकटकाळी आधार मिळू शकतो.