मधुमेहविषयक भलभलत्या कल्पनांनी तुम्ही गोंधळून गेला आहात का? तर मग हे पुस्तक वाचाच. जे तुम्हांला मधुमेहाची सांगोपांग व अद्ययावत माहिती देईल. यातील तज्ज्ञ डॉक्टरांनी केलेली चर्चा व दिलेल्या विविध उपचार पद्धती केवळ मधुमेहींनाच नव्हे तर सर्वच जिज्ञासूंना खूप उपयोगी ठरतील. आपल्या आरोग्याविषयी माहिती मिळवून स्वत:ची व इतरांची काळजी घेणे हे प्रत्येक जागृत व्यक्तीचे कर्तव्यच आहे.