फ्रंक गिलबर्ट या गृहस्थावर त्यांच्या एका मुलाने व मुलीने मिळूल लिहिलेले पुस्तक चरित्रवजा असूनही, ते इतके मनोवेधक व मनोरंजक आहे, की पूर्ण केल्याशिवाय खाली ठेववत नाही.हे गृहस्थ व्यवसायाने इंजिनीअर! कमीत कमी वेळात जास्तीत जास्त कामे कुशलतेने कशी करावीत, यावर ते संशोधन करत व त्याचे आपल्या मुलांवर प्रयोगही करुन पाहत. खास वेळ न खर्चता, स्नान करता-करता, फ्रेंच भाषेच्या टेप्स ऐकवून त्यांनी मुलांना उत्तम फ्रेंच बोलायला शिकविले होते. असे अनेक प्रयोग त्यांनी आपल्या मुलांवर केले होते. त्यांची फिल्म त्या वेळी अनेक अमेरिकन चित्रपटगृहांत दाखवली जात असे. इतके तिथल्या लोकांना त्यांच्या शिक्षणपद्धतीचे कौतुक वाटत असे.आपल्याकडील जास्तीत जास्त लोकांनी ते वाचावे व अमलात आणावे, असे वाटले, म्हणूनच त्याचा हा अनुवाद सिद्ध करून सुज्ञ वाचकांसमोर ठेवला आहे.