चिकन सूप फॉर दि कपल्स सोल देवानी गाठी जरी स्वर्गात बांधल्या, तरी विवाह साजरे होतात इथे पृथ्वीवरच! ते निभवावेही लागतात आपल्या तुपल्यालाच! कसं निभावतो आपण हे नातं? त्याच्या या कथा! एकांड्या आयुष्यात दुसयाचा प्रवेश झाला, की जावनाचे आयाम बदलतात. मग प्रेमाच्या बहरात सप्तरंगी स्वप्नं पुÂलतात. रोमान्स, स्पूÂर्ती, उत्साहाची कारंजी उडतात. जबाबदारी वाढली की संघर्र्ष आला संकटं आली! एकमेकाच्या मदतीनी त्यांनाही तोंड देण्याची हिंमत येते. प्रेम कार्यप्रवण बनवतं प्रेम व्यक्तीला स्वतंत्र करतं. कधी भानावर आणायचं कर्तव्य पार पाडतं कधी आत्मभान जागृत करतं! एकमेकाला गृहीत धरलं तरी एकमेकाचा आदर करायला शिकवतं. मुरलेलें प्रेम जन्मोजन्मीची साथ करतं. हळुवार प्रेम तितकंच कणखरही असतं. कुटुंबसमाज अशा अवघ्या पसाNयात स्वतःच्या अस्तित्वाचा शोध घ्यायला प्रवृृत्त करतं. पतीपत्नीच्या सहजीवनाच्या अशा या कथा आपल्या प्रत्येक भावनेला स्पर्श करतात. काही कथा जुन्या पण आजही तितक्याच ताज्या वाटणाया कालातीत! देशातीतही. फरक फक्त संस्कृतीचा आहे. पाश्चात्य संस्कृतीच्या चष्म्यातून कथा वाचल्या, की लक्षात येतं, अरे या तर आपल्याच कथा आपल्या आयुष्यात आपल्या आसपास घडणाया! कपल्ससाठी असणारं हे ‘चिकन सूप’, ‘तुमचं आमचं सेम असतं’ याची प्रचीती देणाया’! अवंती महाजन