दमा हा एक त्रासदायक आणि काही वेळेस जीवघेणा ठरणारा आजार आहे; त्या आजाराची लक्षणं काय आहेत, दमा होण्याची कारणं इ. दम्याशी संबंधित सर्व गोष्टींची माहिती देणारं ‘चिकन सूप फॉर द सोल अस्थमा’ हे पुस्तक आहे. त्याचे मूळ लेखक आहेत नॉर्मन एच. एडेलमन, जॅक वॅÂनफिल्ड, मार्वÂ व्हिक्टर हॅन्सन. अनुवादक आहेत वसु भारद्वाज. दम्यामुळे येणारं नैराश्य, त्यातून जर औषधं घेणं बंद केलं तर होणारे भयंकर परिणाम यापासून डॉक्टरांना कोणती माहिती द्यायची, कोणती विचारायची, गरज पडली तर दुसNया तज्ज्ञाचा सल्ला कसा घ्यायचा, हेही या पुस्तकात नमूद केलं आहे. दम्यावरच्या औषधोपचारांची सविस्तर माहिती, दम्याच्या रुग्णांनी कोणते व्यायाम करावेत आणि त्याचे फायदे काय आहेत, दम्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी त्या संदर्भातली शिबिरं कशी उपयुक्त ठरतात, हेही या पुस्तकात सांगितलं आहे. लहान मुलांमध्ये दिसणारी दम्याची लक्षणं, त्याचे उपचार याचंही मार्गदर्शन यात मिळतं. दम्याच्या रुग्णांचे, दमा असलेल्या मुलांच्या पालकांचे अनुभव या पुस्तकात समाविष्ट करण्यात आले आहेत. तसेच दमा असलेल्या विविध क्षेत्रांतील नामवंतांची यादी या पुस्तकात पाहायला मिळते. त्यामुळे दमा असूनही जीवनात प्रगती साधता येते, असा विश्वास दम्याच्या रुग्णांना ही यादी वाचून मिळू शकतो. दम्यासारख्या आजाराचा अतिशय साध्या, सोप्या भाषेत सर्वांगीण वेध घेणारं हे पुस्तक आहे.