चिकन सूप फॉर सोलच्या मालिकेतील आणखी एक आरोग्यविषयक पुस्तक म्हणजे ‘चिकन सूप फॉर द सोल पाठदुखी’. या पुस्तकाचे मूळ लेखक आहेत जोनाथन ग्रीर, एम.डी.एफ.ए.सी.पी.,एफ.ए.सी.आर.,जॅक कॅनफिल्ड, मार्क व्हिक्टर हॅन्सन. अनुवादक आहेत वसु भारद्वाज. या पुस्तकात पाठदुखीविषयी सांगोपांग चर्चा केली आहे. पाठदुखीची वेदना नक्की कशी आणि कुठे जाणवते, वेदनांचे स्वरूप, वेदना कशामुळे कमी होतात विंÂवा वाढतात याविषयी या पुस्तकात चर्चा केली आहे. पाठीचं दुखणं अचानक उद्भवण्याची कारणं आणि त्यावरील उपचार याविषयी या पुस्तकात माहिती मिळते. जुनाट पाठदुखी, त्यासाठी करायचे व्यायाम, त्यावरील उपचार याविषयीही या पुस्तकात सांगितले आहे. काही वेळेला नुसत्या आरामानेही पाठदुखी बरी होऊ शकते, असंही एक उदाहरण यात नोंदवलं आहे. पाठदुखीच्या रुग्णांचे अनुभव या पुस्तकात समाविष्ट केले आहेत. ते पाठदुखीच्या रुग्णांना दिलासा देणारे आहेत. तर, पाठदुखीविषयी साध्या सोप्या भाषत्ो सर्वांगीण माहिती देणारं हे पुस्तक आहे.