• ‘कुटुंब!’ आपल्या जगण्याला अर्थ देणारी सुंदर संकल्पना. कौटुंबिक जिव्हाळा, जबाबदारी आणि त्यातल्या आत्मियतेचा प्रत्यय ‘चिकनसूप फॉर द पॅÂमिली मॅटर्स’ पुस्तकातून येतो. कुटुंब म्हटलं की अपरिहार्यतेने प्रथम उल्लेख येतो तो आई - वडिलांचा. त्यामुळे या नात्याला प्राधान्य देत ‘पूर्वजांबद्दल’ या विभागात आई - वडिलांविषयीच्या कथांचा समावेश करण्यात आला आहे. यात विविध वयोगटांतील मुला-मुलींनी आपल्या आई-वडिलांविषयी लिहिलं आहे. या कथांमध्ये आईचा विंÂवा वडिलांचा आई-वडील म्हणून विचार न करता एक व्यक्ती म्हणून विचार केला आहे. त्यामुळे विविध स्वभावाच्या व्यक्तींचं या कथांमधून दर्शन घडतं. ‘थोडेसे पेचप्रसंग’ या विभागात छोट्या छोट्या गोष्टींमुळे निर्माण झालेले पेच आणि त्यातून निर्माण झालेली गंमत वाचकांचं मनोरंजन करून जाते. ‘नवविवाहित आणि प्रौढ’ या विभागात तरुण आणि प्रौढांमधील मतभेद, तसेच प्रौढ दांपत्याचा आदर्श समोर ठेवणाNया नवीन जोडप्यांच्या कथा समाविष्ट करण्यात आल्या आहेत. ‘हास्याची कारंजी आणि आनंदाचे झरे’ या विभागात कुटुंबात काही वेळेला छोट्या छोट्या गोष्टींतून हास्याची कारंजी आणि आनंदाचे झरे कसे निर्माण होतात हे सांगणाNया कथा आहेत. ‘कौटुंबिक गंमत’ या विभागात अगदी साध्या साध्या प्रसंगांतून कुटुंब या संस्थेवर अगदी हलक्यापुÂलक्या स्वरूपात भाष्य करणाNया कथा आहेत. या कुटुंबकथा असल्या तरी विविध स्वभावाच्या व्यक्तिरेखा या कथांतून भेटतात आणि नात्यांचा बहुरंगी गोफ या कथांतून सहजपणे विणला जातो.