‘कुटुंब!’ आपल्या जगण्याला अर्थ देणारी सुंदर संकल्पना. या कौटुंबिक जगण्याचा परिपाक म्हणजे ‘चिकनसूप फॉर द पॅÂमिली मॅटर्स’. चिकन सूपच्या या भागातील कथा पाच विभागांत विभागल्या आहेत. ‘थोडासा विचित्रपणा’ या विभागात कुटुंबातील एखाद्या विचित्र व्यक्तीविषयीच्या, तिच्या खटकणाNया वर्तनाविषयाच्या कथा आहेत. ‘मुलं ती मुलंच’ या विभागात लहान मुलांवर वेंÂद्रित कथा आहेत. त्यात लहान मुलांची स्वभाववैशिष्ट्यं, त्यांच्या गमतीजमती अधोरेखित केल्या आहेत. ‘रस्त्यावरच्या गमतीजमती’ या विभागात रस्त्यावर कुटुंबाच्या बाबतीत घडलेल्या गमतीजमतींचं चित्रण आहे. गाडी चालवताना नवNयाची झालेली फजिती, गाडीत भावंडांची भांडणं इ. मनोरंजक अनुभव या कथांतून वाचायला मिळतात. ‘फारसे गंभीर नाही’ या विभागात मृत्यूसारख्या गंभीर प्रसंगीही काही न पटणाNया तरी आवश्यक असलेल्या गोष्टी कशा कराव्या लागतात विंÂवा घडतात याचं चित्रण आहे. ‘आयुष्याची गंभीर बाजू’ या विभागात अर्थातच जीवनात घडणाNया गंभीर गोष्टी आणि त्याचा संबंधित व्यक्तीवर आणि तिच्या आजूबाजूच्या लोकांवर होणारा परिणाम दर्शविणाNया कथा आहेत. अगदी साध्या साध्या प्रसंगांतून कुटुंब या संस्थेवर अगदी हलक्यापुÂलक्या स्वरूपात भाष्य करणाNया या कथा आहेत.या कुटुंबकथा असल्या तरी विविध स्वभावाच्या व्यक्तिरेखा या कथांतून भेटतात आणि नात्यांचा बहुरंगी गोफ या कथांतून सहजपणे विणला जातो.