शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. यात देणारा आणि घेणारा दोघंही शिकत, शिकवत असतात. कित्येक शिक्षक विद्याथ्र्यांना तळमळीनं शिकवत असतात. शिक्षकांच्या आचारविचारांमुळे, त्यांच्या शिकवण्यामुळे विद्याथ्र्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळत असते. शिक्षक ज्याप्रमाणं विद्याथ्र्यांना शिकवतात, त्याप्रमाणेच विद्यार्थीही काही वेळा आपल्या वागण्यातून शिकवतात, प्रेरणा देतात. शिक्षकांचा विद्याथ्र्यांवर नकळत पडणारा प्रभाव, कळतनकळत होणारे संस्कार यामुळे विद्याथ्र्यांचं आयुष्य समृद्ध होत असतं. याबद्दलची कृतज्ञता यातील अनुभवांतून व्यक्त होताना दिसते. ही समृद्धी आणि कृतज्ञता हेच शिक्षकाचं वैभव असतं. शिक्षकी पेशातील अशाच विविध अनुभवांचं अनोखं मिश्रण या पुस्तकात आहे. आजच्या परिस्थितीत शिक्षकाला आपलं कार्य करत असताना कित्येक वेळा निराशा येते. ही निराशा दूर करण्यासाठी हे ‘चिकन सूप’ अत्यंत गुणकारी आहे.